सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार

सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार

भाजपा नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाचे शिष्टमंडळ सोमवार, २५ एप्रिल रोजी दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला.

केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या परिस्थितीला घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसल्याचे सोमय्या म्हणाले. राज्यातील सामान्य नागरिक, त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी यांच्यावर हल्ले होतात, त्यांना धमक्या दिल्या जातात यासंबंधी त्यांच्याकडे तक्रार केल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

यापूर्वी झालेल्या अशाच सात घटनांचे उदाहरण केंद्रीय गृहसचिवांना दिल्याचे सोमय्या म्हणाले. पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांच्या उपस्थित होतो त्यामुळे या प्रकरणाची दखल गांभीर्याने घ्यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. तसेच तपासासाठी विशेष पथक पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच हे प्रकरण केंद्रीय गृहसचिवांनी गांभीर्याने घेतलं असून आवश्यक पावलं उचलणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये दोन दलित तरुणांची हत्या

लाकडांमध्ये लपवले होते ७०० कोटींचे हेरॉईन

‘राणा दाम्पत्यांची केसच बोगस’

गुवाहाटी महापालिका निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ५८ जागा जिंकल्या

दरम्यान, राज्यात सध्या भाजपा आणि शिवसेना यांच्यात राजकीय युद्ध रंगल्याचे चित्र आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, नेते पराग शाह, भाजपा महापालिका नेते विनोद मिश्रा हे केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेण्यासाठी गेले होते.

Exit mobile version