29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणखंडेरायाचं दर्शन घेऊन निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर

खंडेरायाचं दर्शन घेऊन निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर

Google News Follow

Related

“मी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी दौरा करत असून कोणत्याही कुटुंबाला लक्ष्य करण्यात रस नाही,” असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. भाजपाने देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यात महाराष्ट्रातील बारामती आणि इतर १५ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

या तीन दिवसीय दौऱ्याला सुरुवात करण्याच्या आधी सीतारामन यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “भारतीय जनता पक्ष (भाजपा) देशातील प्रत्येक क्षेत्रात आपली संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे.” सध्या पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे प्रतिनिधित्व करत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाचे अधिक लक्ष आहे का? यावर सीतारामन म्हणाल्या की, त्यांचा पक्ष देशाच्या प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहे. मी पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी बारामतीत आले आहे. मी कोणत्याही कुटुंबासाठी आलेली नाही.”

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, सीतारामन त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती, पुरंदर, इंदापूर, दौंड, भोर आणि खडकवासला या सहाही विधानसभा मतदारसंघांना भेट देणार आहेत.

खंडेरायाचे घेतले दर्शन

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी सकाळी जेजुरीतील खंडेरायाच्या मंदिराला भेट दिली. निर्मला सीतारामन यांनी जेजुरी संस्थानच्या पदाधिकऱ्यांची बैठकही घेतली. यावेळी जेजुरी गडाला पर्यटनाचा दर्जा मिळावा, वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळावा तसेच जेजुरी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात, असे निवेदन संस्थानच्या वतीने देण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा