उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे मत मांडले आहे.

उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?

केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये उत्तराखंड आणि गुजरात राज्यांत यासंदर्भात पावलेसुद्धा उचलली जातं आहेत. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे मत मांडले आहे. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर समान नागरी कायद्याबाबतच्या चर्चांना राज्यात उधाण आलं आहे.

समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता तो उत्तराखंडही लागू करत आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात हेसुद्धा समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहेत. पुढे हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायद लागू करतील तसेच त्यांना करावाच लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

संविधानाने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल. संविधानाने याबाबत आपल्यावर जबाबतदारी टाकलीय की आपण राज्यात समान नागरी कायदा आणावा. त्यामुळे हळूहळू सर्व राज्ये हा कायदा लागू करतील असं मला वाटतं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु

प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीला रामराम

ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित

अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी

नुकतंच गुजरात सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत समान नागरी कायद्यासाठी समिती गठित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. देशभरातून समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे गुजरात सरकराने या महत्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेतलाय, असं केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगितले होते. याच वर्षी उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले.

Exit mobile version