मोदी सरकारची पीएलआय योजना ठरली ‘स्मार्ट’

मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेच्या (पीएलआय) अंतर्गत निवडण्यात आलेल्या स्मार्टफोन उत्पादकांनी पहिल्या पाच महिन्यांत ३५ हजार कोटींच्या उत्पादकांची निर्मिती केली आहे.

मोदी सरकारची पीएलआय योजना ठरली ‘स्मार्ट’

३५ हजार कोटींच्या स्मार्टफोन उत्पादनांची निर्मिती

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन निर्मितीसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेच्या (पीएलआय) अंतर्गत निवडण्यात आलेल्या स्मार्टफोन उत्पादकांनी १३०० कोटींची गुंतवणूक केली आहे. या उत्पादकांनी पहिल्या पाच महिन्यांत ३५ हजार कोटींच्या उत्पादकांची निर्मिती केली आहे. त्याशिवाय, पहिल्या तीन महिन्यांत या निवडक कंपन्यांनी २२ हजार नोकरीच्या संधीही निर्माण केल्या. केंद्र सरकारच्या या योजनेला मिळालेल्या या यशामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझेचा साथीदार रियाझ काझीला अटक

‘हिटमॅन’चे गेंड्याच्या बचावासाठी आवाहन

आजपासून देशभरात ‘लसोत्सव’

१ एप्रिल २०२०ला ही योजना कार्यान्वित झाली. या निवडक कंपन्यांना पाच वर्षांसाठी चार ते सहा टक्के वाढीव विक्रीवर या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. केंद्र सरकारने या योजनेसाठी १६ कंपन्यांची निवड केली आहे. त्यात सॅमसंग, फॉक्सकॉन हॉन हाल, रायझिंग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्यांचा समावेश आहे. त्यापैकी विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन या ॲपलसारख्या कंपनीशी करारबद्ध असलेल्या कंपन्या आहेत. ज्या भारतीय कंपन्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली त्यात लाव्हा, मायक्रोमॅक्स (भगवती), पॅडजेट इलेक्ट्रॉनिक्स, यूटीएल निओलिन्क्स, ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे.

केंद्राने इतर उद्योगक्षेत्रातही निर्मितीक्षमता वाढविण्यासाठी पीएलआय योजना अमलात आणली आहे. ३ मार्चला माहिती तंत्रज्ञानातील हार्डवेअर निर्मितीत या योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत लॅपटॉप, टॅब्स, सर्व्हर्स आदि उत्पादने येतात.

Exit mobile version