25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरराजकारणकल्याणमधील मराठी माणसावर हल्ला प्रकरणी अखिलेश शुक्ला निलंबित

कल्याणमधील मराठी माणसावर हल्ला प्रकरणी अखिलेश शुक्ला निलंबित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानपरिषदेत प्रतिपादन

Google News Follow

Related

कल्याण परिसरात एका इमारतीमध्ये मराठी कुटुंबियाला परप्रांतीय व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी माणसांविषयी गरळ ओकत देशमुख कुटुंबीयांना माराहाण केल्याची घटना घडली असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेल्या अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम २८९ अन्वये चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य ऍड. परब, शशिकांत शिंदे, भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले आहे. शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. 

महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा: 

सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

वऱ्हाड घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात पलटली; पाच जणांचा मृत्यू

सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार!

जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ८ जणांचा होरपळून मृत्यू!

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा