काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली प्राण्यांना त्रास दिला म्हणून प्राण्यांचा छळ करण्याविरोधातील कायद्यातील कलम ११ व ४२८ अंतर्गत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईत झालेल्या एका आंदोलनात भाई जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते बैलगाडीवर उभे राहून घोषणाबाजी करत होते. त्या बैलगाडीवर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उभे राहिले होते. त्याचे वजन सहन न होऊन ती गाडी मोडली आणि सगळे कार्यकर्ते खाली कोसळले. या घटनेनंतर आमदार भातखळकर यांनी उपरोक्त मागणी मुंबई पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
हे ही वाचा:
‘टीका वाली नाव’…बिहारमधले अनोखे लसीकरण केंद्र
लवकरच १५% नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी?
बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार
उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक?
भातखळकर यांनी असेही म्हटले आहे की, कोविडचे नियम पाळले नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग केला म्हणूनही जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा. मुंबई पोलिसांनी जर सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून जगताप यांना वाचविले तर याविरोधात भारतीय जनता पार्टी न्यायालयात दाद मागेल, असा इशाराही आमदार भातखळकर यांनी दिला आहे.
एका बैलगाडीवर जेवढे लोक बसू शकतात त्याच्या चारपट ओझे लादून बैलांचा छळ केल्याबद्दल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याचा गुन्हा दाखल करावा, कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याप्रकरणीही कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. pic.twitter.com/nYZstpUTEO
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 10, 2021