“महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी”

“महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२१ फेब्रुवारी) जनतेला संबोधित केलं. उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष होतं. मुख्यमंत्री कदाचित लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शंका आणि भिती अनेकांना होती. परंतु आजच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अघोषित आणिबाणीचीच जाहीर केली आहे.

उद्धव ठाकरेंनी, सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आंदोलनांवर, यात्रांवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या विरोधात सध्या विरोधीपक्ष आक्रमक होत आहे. धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्यासारख्या मंत्र्यांची अनेक ‘प्रकरणं’ जनतेसमोर येत आहेत. या सर्व प्रकरणांमुळे कोणत्याही मंत्र्याला आजवर राजीनामा द्यावा लागलेला नाही. ठाकरे सरकारने अशा सर्वच मंत्र्यांना पाठीशी घातले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये आता सरकारवर दबाव वाढून या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल अशी चिन्ह होती. परंतु राजकीय मोर्चांवर बंदी घालून आता उद्धव सरकारने या मंत्र्यांची चिंता दूर केली आहे.

हे ही वाचा:

“उद्धव ठाकरेंची मनस्थिती निबर” – भाजपा नेत्याचा हल्लाबोल

याशिवाय शिवजयंतीला शाहीर हेमंतराजे मावळे यांच्यासारख्या शिवप्रेमींना देखील या सरकारने ताब्यात घेतले होते. आता तर धार्मिक प्रश्नांवर आंदोलन करण्यासाठीही सरकारने बंदी आणली आहे.

“महाराष्ट्र सरकारची कामगिरी कुचकामी असल्याने राजकीय मोर्चांवर बंदी आणावी हे सरकारला वाटणे स्वाभाविक आहे. पण ही मागील दाराने आणलेली आणीबाणीच आहे आणि आम्ही ती जुमानणार नाही.” अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

Exit mobile version