विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना ५० हजार रुपये द्या

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना ५० हजार रुपये द्या

कोरोनावर आळा घालण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार गेला. त्याचबरोबर राज्यातील शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त शिक्षकच नाही तर त्यांचे कुटुंबीयही या संकटातून जात आहेत. त्यामुळे कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे ५० हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तशी माहिती खुद्द दरेकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे ५० हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. शाळा बंद असल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती विदारक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे.

हे ही वाचा:

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार

२०३२ चे ऑलिम्पिक ‘या’ शहरात होणार…

प्राथमिक शाळा सुरु कराव्यात

इराकमध्ये आयएसआयएस डोकं वर काढतंय?

१७ जुलै रोजी प्रवीण दरेकर हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. ‘कोरोनामुळे शाळा बंद असल्याने उपजिविका भागवण्यासाठी औरंगाबाद (संभाजीनगर) येथील एका शिक्षकाने शिक्षकी पेशा बाजूला ठेऊन दुकानांवर जाऊन चिकटटेप विकणे स्वीकारले तसेच पैठण तालुक्यातील रांजणगाव येथील शिक्षकाने गावाकडे जाऊन शेती केली,या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या’, असं दरेकरांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर राज्य सरकार विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या अवस्थेकडे गंभीरपणे पाहत नाही. त्यामुळे या प्रश्नावर आवाज उठविणार आहे. अशा शाळांमधील शिक्षकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचा आग्रह राज्य सरकारकडे करणार आहे, असं दरेकर यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

Exit mobile version