लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जे यश मिळाले त्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाचा मोठा वाटा होता. त्यालाच वोट जिहाद असे म्हटले गेले. आता विधानसभा निवडणुकीतही अशाच पद्धतीने एकगठ्ठा मते मिळावीत अशी अपेक्षा महाविकास आघाडीचे नेते आणि पक्ष बाळगून आहेत.
भाजपाचे नेते नितेश राणे यांनी असाच एक व्हीडिओ शेअर करत त्यातून उबाठा गट किंवा महाविकास आघाडी कशी मुस्लिमांच्या मतांसाठी आतूर झाली आहे, याचे प्रत्यंतर घडविले आहे.
या व्हीडिओत काही उलेमा उबाठा गटातील नेत्यांच्या उपस्थितीत मुस्लिमांचा महाविकास आघाडीला कसा पाठिंबा मिळेल, याची ग्वाही देत आहेत. उबाठा गटाचे आमदार सचिन अहीर, सुनील प्रभू हे या उलेमांच्या बैठकीत बसलेले दिसतात आणि त्यांना हे उलेमा मुस्लिमांच्या समस्या सांगत आहेत. त्यात एक उलेमा म्हणत आहेत की, ही लढाई एखाद्या जागेची नाही तर संविधानाच्या सुरक्षेची लढाई आहे. देशाच्या सुरक्षेची लढाई आहे. अनेक वर्षे एकमेकांसोबत मित्रत्वाच्या नात्याने एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे आम्ही राहात होतो. पण गेल्या १० वर्षांत आपल्या देशाची जी अवस्था झाली, ज्या पद्धतीने आपल्या संविधानाला धक्का लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे, ते आम्हाला दुःख देणारे आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतील प्रदूषण; पेंढा जाळणाऱ्याला दुप्पट दंड
बाबा सिद्दीकीच्या निकटवर्तीयांना जीवे मारण्याची धमकी
लोकसभेच्या पराभवानंतर भाजपाने केले मायक्रो मॅनेजमेन्ट!
…आणि उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले!
ते म्हणतात, आपल्या अनेक पिढ्यांनी स्वतःचे बलिदान देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज त्या देशात मुस्लिमांसोबत जे होते आहे त्याचे दुःख होते. आम्ही या देशात बलिदान दिले आजही देतो आहोत आणि तो त्याग करतच राहू. आमचे शरीरही याच मातीत दफन होईल.
आपण ज्या उद्देशाने इथे आला आहात त्याच्या सोबत आम्ही आहोत. खूप मेहनत घेऊन मागील निवडणुकात आम्ही उलेमांनी मैदानात उतरून मदत केली. ज्यामुळे इतक्या जागा आपल्याला मिळाल्या. आजसुद्धा आपण अशीच मेहनत घेऊ. जिंकल्यानंतर आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांचे पालन आपण केलेत तर आम्हाला आनंद होईल. शिवाय आम्हालाही बळ मिळेल, आमचाही जोश वाढेल. जिंकल्यानंतर ज्या समस्या आमच्यासमोर आहेत, त्या सोडविल्या जातील.