युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

रशिया युक्रेन युद्धाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजूनही रशियन लष्करची युक्रेनवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी शनिवारी एका दूरचित्रवाणी भाषणात भारताला आवाहन केले.

भारतासह अनेक देशांना रशियाला आपल्या देशातील संघर्ष संपविण्याचे आवाहन केले. विशेषत: कुलेबा यांनी त्यांच्या भाषणात भारताचा उल्लेख करून रशियाला युद्ध थांबण्यास सांगण्याचे आवाहन केले आहे.

दिमित्रो कुलेबा यांनी भारतासह रशियाशी विशेष संबंध असलेल्या सर्व देशांना व्लादिमीर पुतिन यांना युद्ध संपवण्याचे आवाहन करत हे युद्ध सर्वांच्या हिताच्या विरुद्ध आहे असे सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींना काय आवाहन केले?

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले, ” भारताशी विशेष संबंध असलेले सर्व देश पंतप्रधान मोदींना आवाहन करू शकतात की त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी सतत संपर्क साधावा आणि त्यांना समजावून सांगावे की हे युद्ध कोणाच्याही हिताचे नाही. तसेच भारत हा युक्रेनमधील कृषी उत्पादनांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. हे युद्ध असेच सुरू राहिल्यास नवीन पिकांची पेरणी करणे कठीण होईल. जागतिक आणि भारतीय अन्न सुरक्षेच्या दृष्टीने हे युद्ध थांबवणे सर्वांच्या हिताचे आहे.”

पुढे ते म्हणाले, ” भारतीय लोक भारतातील रशियन दूतावासावर दबाव आणू शकतात आणि रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी करू शकतात. युक्रेन केवळ आमच्यावर हल्ला झाला म्हणून लढत आहे आणि आम्हाला आमच्या भूमीचे रक्षण करायचे आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी मेट्रो प्रवासात दिव्यांग तरुणांशी मारल्या गप्पा

पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण

‘पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा’

गेली काही दशके सुस्तपणे कामे झाली, प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायला हवेत!

दरम्यान, जेव्हा पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांचे फोनवर बोलणे झाले होते. मोदींनी तेव्हा पुतीन यांना युद्ध न करता शांततेने चर्चा करण्याचे सांगितले होते.

Exit mobile version