बोरिस जॉन्सन ‘बाबा बुलडोझर’ का बनले?

बोरिस जॉन्सन ‘बाबा बुलडोझर’ का बनले?

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. जॉन्सन हे गुरुवार, २१ एप्रिल रोजी अहमदाबादला पोहोचले. तेथे त्यांनी शहरातील अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला. दरम्यान त्यांनी हलोल येथील जेसीबी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भेट दिली आणि जेसीबीवरून फेरफटका मारला.

बोरिस यांची ही जेसीबी कंपनीला दिलेली भेट विशेष चर्चेत आली कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेल्या लोकांच्या मालमत्ता नष्ट करण्यासाठी जेसीबीचा वापर केला आणि बुलडोझर मॉडेल प्रसिद्ध झाले आहे.

बुलडोझर बनवणाऱ्या कंपनीचे नाव JCB म्हणजेच JC Bamford Excavators असून ती इंग्लंडची आहे. या कंपनीचे भारतात पाच उत्पादन कारखाने आहेत, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी बल्लभगडमध्ये आहे. जिथून ११० देशांमध्ये हे जेसीबी निर्यात केले जातात.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या कार्यालयालाही भेट दिली. या भेटीचा फोटो गौतम अदानी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. “ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे अदानी मुख्यालयात स्वागत करताना अभिमान वाटला. संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञानासाठी आम्ही इंग्लंडमधील कंपन्यांशी कामावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

सदावर्ते पाच दिवस कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

सिग्नलला फडका बांधून देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा

सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!

पनवेलचा सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल

दरम्यान, भारतात पोहोचताच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विट केले की, “जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतात येऊन अत्यंत आनंद वाटत आहे. दोन्ही देशांसाठी अनेक शक्यतांवर एकत्र काम करण्याच्या संधी दिसून येत आहेत. आमची सर्वात मोठी भागीदारी म्हणजे नोकरीच्या संधी, प्रगती आणि संधी विकसित करणे. आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट होण्याची मला अपेक्षा आहे.”

Exit mobile version