ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे ‘पार्टीगेट’ प्रकरणी वादात सापडले होते. या प्रकरणी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. मात्र, बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावा विरोधात विजय मिळवला आहे. बोरिस जॉन्सन यांना हटवण्यासाठी १८० मतांची गरज होती. मात्र, केवळ १४८ मते मिळवता आल्याने बोरिस जॉन्सन यांनी आपलं पद टिकवून ठेवलं आहे.
बोरिस जॉन्सन यांना २११ मतं मिळाली. तर विरोधक १४८ मतंच जमवू शकले. जून २०२० मध्ये पंतप्रधान निवासस्थान डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित एका वाढदिवसाच्या पार्टीत कोरोना संदर्भातील नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला होता. ४० हून अधिक खासदारांनी कोरोना काळात देशात लॉकडाऊन असताना पार्टी करून नियम मोडल्याचे विरोधकांनी सांगितले होते. या आरोपावरून जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
सरकारी कार्यालयांमधील पक्षांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे लक्षात आल्यावर पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या पत्नी कॅरी यांच्यावर डाऊनिंग स्ट्रीटमध्ये लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करुन वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला होता.
हे ही वाचा:
२००६ वाराणसी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी
रायगडावर निर्बंधमुक्त शिवराज्याभिषेकाचा अमाप उत्साह
मूसेवाला हत्येप्रकरणी पुण्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या
‘ठाकरे सरकारमधील मंत्री टक्केवारी मागतात’
सध्याच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नियमांनुसार, बोरिस जॉन्सन यांना या अविश्वास ठरावाविरोधात मिळवलेल्या विजयानंतर किमान १२ महिन्यांपर्यंत अशा प्रकारच्या अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागणार नाही.