राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसचे नेते उदित राज हे सध्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत.
उदित राज यांनी ट्विट केले आहे की, द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रपती कोणत्याही देशाला लाभल्या नसतील. चमचेगिरीच्या पण काही मर्यादा असतात. त्या म्हणतात की, ७० टक्के लोक हे गुजरातमधील मीठ ग्रहण करतात. त्यांनी मीठ खाऊन जगून दाखवावे. यानंतर उदित राज यांनी आणखी एक ट्विट करत मुर्मू यांच्याबद्दल केलेले विधान खासगी आहे, ही काँग्रेसची भूमिका नाही, असे मत व्यक्त केले. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केले आणि आदिवासींच्या नावावर मते मागितली गेली. राष्ट्रपती बनल्यानंतर त्या आदिवासी राहिल्या नाहीत का? देशाच्या राष्ट्रपती असल्या तरी त्या आदिवासींच्या प्रतिनिधीही आहेत.
हे ही वाचा:
वांद्रे वरळी सी लिंकवर प्राण वाचविणाऱ्या चेतन कदमच्या नशिबी आला दुर्दैवी मृत्यू
तर ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होऊ देणार नाही
तस्करीचा नवा प्रयोग, खाद्यपदार्थाच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ
युरोपियन देशात असेल आता एकच मोबाईल चार्जर
मुर्मू यांनी गुजरात दौऱ्यावर असताना वक्तव्य केले होते की, गुजरातमध्ये देशातील ७६ टक्के मीठ तयार होते. देशातील बहुसंख्य लोक हे गुजरातमधील मीठ ग्रहण करतात. यावरून देशभरात राजकारण पेटले. भाजपाने उदित राज यांच्यावर शरसंधान केले. भाजपाचे प्रवक्त संबित पात्रा म्हणाले की, उदित राज यांनी केलेले हे वक्तव्य चिंताजनक आणि दुर्दैवी आहे. यावरून आदिवासीविरोधी मानसिकतेचे दर्शन घडते असे ते म्हणाले.
याआधी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही राष्ट्रपतींना उद्देशून आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्यांना त्यांनी राष्ट्रपत्नी का म्हणू नये असा सवाल उपस्थित केला. उत्तर प्रदेशमध्ये जितिन प्रसाद यांनी म्हटले की, उदित राज यांनी या घाणेरड्या राजकारणातून बाहेर पडावे आणि राष्ट्रपतींच्या प्रती आदर व्यक्त करावा.