शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यात शेतकरी मेळावा झाला. महाराष्ट्र पिंजून काढणार असे वक्तव्य करणाऱ्या ठाकरे या बुलढाण्यात चिखली येथे झालेल्या मेळाव्या निमित्ताने बाहेर पडले. दसऱ्यानंतरच बुलढाण्यात झालेला पहिला मेळावा होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा खोके सरकारचे आरोप केले. काहीच नवीन मुद्दे न मांडता ठाकरे यांनी शिंदे सरकार, भाजप, केंद्र सरकार यांच्यावर टीका करण्या पलीकडे भाषणात काहीच नव्हते. .
गद्दार, मिंधे सरकार, खोके सरकार असे आरोप वारंवार करून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा जुनेच मुद्दे उकरून काढले. शिवसेनेत बंद झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गोहाटीमध्ये कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यानी नवस केलेला होता. तो फेडण्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह शनिवारी गोहाटीला गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं. ज्यांना स्वत:चं भविष्य माहिती नाही ते आपलं भविष्य ठरवणार शिकवणार. तुमचं भविष्य सर्वांना माहीत आहे. नवस फेडत आहेत कर्तृत्वावर विश्वास नाही का ? असे ठाकरे म्हणाले. पण शिंदे यांच्या कर्तुत्वामुळेच राज्यात नवीन सत्तांतर झाले हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. पण उद्धव ठाकरे अजूनही त्या धक्यातून सावरलेले नाहीत हेच या भाषणात दिसून आले. त्यामुळे ते आपल्या भाषणात वारंवार गद्दार आमदार असा उल्लेख करत होते.
भैया मेरे राखी के बंधन को निभाना असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भावना गवळी यांच्यावर टीका केली. वास्तविक भावना गवळी या दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राखी बांधतात. या राखी बांधण्याचा संबंध ईडीशी लावला आणि पुन्हा जुनाच मुद्दा उरकून काढला. आमदार भावना गवळी यांनी देखील हा मुद्दा किती वेळा उगाळून काढणार असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा :
विरोधकांना काम उरले नाही म्हणून टीका
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
दोन शाळांमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू
‘डेटिंग ॲप’वर कोट्यावधी रुपयांना महिलेने तरुणाला लुटले
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात गुजरातमधील निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेले असे वक्तव्य केले. पण दोन वर्षे महाविकास आघाडीचेच सरकार होते. त्यांच्याच काळात उद्योग बाहेर गेले. उद्योग बाहेर जाऊ नये यासाठी कोणतेही प्रयत्न केलेलं नाही. पण त्यांनी या सगळ्यासाठी राज्यातील नवीन सरकार कसे कारणीभूत आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.