रिपाइचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींना भेटून ही मागणी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे” अशी टीकाही त्यांनी यावेळी आघाडी सरकारवर केली.
हे ही वाचा:
“राहुल गांधींनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी.”
रिपाइंच्यावतीने आज विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामदास आठवले यांनी ही मागणी केली. यावेळी कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, रिपाइंचे सुरेश बारशिंग, रिपाइं पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, चंद्रशेखर कांबळे, राम जाधव, सतीश बोर्डे, नंदा मोरे, तेजश्री मोरे, इंदिरा दोंदे, साक्षी बोर्डे आदी नेते उपस्थित होते.
हे ही वाचा:
पालघर तालुक्यात ८ तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. उद्धवजींचे सरकार “नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे” अशी टीकाही त्यांनी कवितेतून केली. पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.