बॅगेची तपासणी होताच उद्धव ठाकरेंची आग-आग

उद्धव ठाकरे यांनी स्वतः शूट केला घटनेचा व्हिडीओ

बॅगेची तपासणी होताच उद्धव ठाकरेंची आग-आग

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला वेग आला आहे. प्रचारसभांचा धडाका सुरू असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी प्रचारासाठी वणी येथे गेले होते. त्यांची वणी येथे जाहीर सभा होती. या सभेला संबोधित करण्यासाठी ते हेलिकॉप्टरने आले होते. यावेळी हेलिकॉप्टरमधून उतरताच उद्धव ठाकरे ठाकरे आणि त्यांचे स्वीय साहायक मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेचा व्हिडीओ शूट केला. यानंतर वणीमधील सभेतून उद्धव ठाकरेंनी या घटनेचा संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी वणी येथे हेलिकॉप्टरने दाखल झालो. त्यावेळी काही अधिकारी माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी म्हटले तुमची बॅग तपासायची आहे. मी त्यांना म्हणालो, तुमचे काम आहे, तपासून घ्या. पण माझी बॅग तपासली तशी कधी नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बॅग तपासली का? जे आपल्या बॅगा तपासत आहे, त्यांचेही खिसे तपासा हा अधिकार आहे. तपास अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या बॅग चालल्या होत्या,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराजी बोलून दाखवली.

हे ही वाचा..

खलिस्तानी दहशतवादी पन्नूनने राम मंदिरावर हल्ला करण्याची दिली धमकी

‘कहो दिल से, अतुलजी फिरसे’

इराकमध्ये अजब कायदा; आता पुरुषांना ९ वर्षांच्या मुलीशीही लग्न करता येईल !

थकलेली, हुकलेली माणसं विधानसभेत पाठवून काय होणार, आग असलेली माणसं हवीत!

पुढे उद्धव ठाकरे असेही म्हणाले की, “मी यंत्रणेला सांगतो, तुम्ही जशी माझी बॅग तपासली, तशीच पतंप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची बॅग तपासली का? तपासायला हवी की नको? दाढीवाल्या शिंदेंची तपासायला हवी की नको? गुलाबी जॅकेटवाल्यांची तपासायला हवी की नको? फडणवीसांची बॅग तपासायला हवी की नको? यांच्या बॅगा जर निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील. मग मात्र, पोलिसांनी मधे यायचं नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी मधे यायचं नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तसं प्रचाराला जो कोणी येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार मतदारांना आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version