28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणउद्धवचा काळ संपला, लवकरच भाजपाची सत्ता येणार

उद्धवचा काळ संपला, लवकरच भाजपाची सत्ता येणार

Google News Follow

Related

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत. आपल्याला आपलं राज्य वाचवाचयं, पुन्हा भाजपाचं सरकार आणायचंय, राज्य उद्धवस्त करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचायचंय”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आजपासून नारायण राणेंची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. मुंबईतल्या पहिल्या भाषणात त्यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला.

मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागत आहेत. सकाळी ११ वाजता त्यांचं मुंबई विमानताळवर आगमन झालं. त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं.

“महाराष्ठ्र उद्वस्त करायला निघालेल्या सांगू इच्छितो, तुमचा काळ संपला आहे. राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार येणार आहे:, असा दावा करत यावेळी राणेंनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळ आणलं. आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी जोमाने काम करावं लागेल, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

“महाराष्ट्रातील सरकाराने गेल्या अडीज वर्षात कोणताही विकास केलेला नाही.  उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचं सरकार येणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

तालिबानला पोसणाऱ्या देशांनाच तालिबानचा धोका?

अश्रफ घनी ‘या’ देशात पळाले

तालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?

“मी काम करु शकतो हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. मला मिळालेलं पद हे जनतेचं पद आहे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर वेगळा अनुभव घेता आला. महाराष्ट्राचं नाव देशात केल्याशिवाय राहणार नाही”, असंही राणे म्हणाले.

नारायण राणेंचं मुंबईत आगामन झाल्यानंतर विमानतळावरुन ते थेट शिवाजी पार्कात जाणार आहे. तिथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते वंदन करतील. तिथेच शेजारी असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी राणे जाणार का?, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा