मुंबई देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर १४ ऑगस्टच्या रात्री ११ वाजता संविधान सभेची बैठक वंदे मातरमने सुरू झाली. हे राष्ट्रगीत सुचेता कृपलानी यांनी गायले होते. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व्होट बँकेच्या राजकारणासाठी वंदे मातरमला विरोध करणारेही आहेत. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या एका चांगल्या उपक्रमाला मुस्लीम संघटना तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याकडून विरोध होत आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयांमध्ये पुढील २६ जानेवारीपर्यंत फोनवरून बोलताना सरकारी कर्मचाऱ्यांनी वंदे मातरम बोलावे अशी सूचना केली आणि तसे आदेश काढले जातील असे सांगितले. त्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली.
आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुस्लिम संघटना रझा अकादमी याला विरोध करत आहेत. तर मुंबई काँग्रेसचे वॉकिंग अध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की, हे सरकार महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी वंदे मातरमचा मुद्दा उपस्थित करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “मागील सरकारमध्ये चर्चेपूर्वी ‘जय महाराष्ट्र’ बोलले जात होता. सध्याचे सरकार शिंदे सरकार असून ते बहुमताचे सरकार आहे. पक्ष आपल्या विचारसरणीनुसार नियम बनवतो, त्याला हरकत नाही.
रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी म्हणाले की, केवळ अल्लाहच आमच्यासाठी पूज्य आहे. इतर कोणताही पर्याय द्या जो सर्वांना मान्य असेल. उलेमांसोबत चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, हा सक्तीचा आदेश नसल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. वंदे मातरम म्हणण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी
शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान
७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज
शिवसेनेला रुचला नाही निर्णय
स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजप शिवसेना सरकारचा हा निर्णय आवडलेला नाही. वंदे मातरम बोलायचे असेल तर काश्मीरमध्ये बोलायला सांगावे, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले. मेहबुबा मुफ्ती यांना वंदे मातरम बोलण्यास सांगावे, भाजपने हिंदुत्वाचे ढोंग करू नये असंही ते म्हणाले.