मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. लसीकरण असो, लॉकडाऊन असो किंवा सरकारची विविध धोरणं असोत, तसेच कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीशी लढण्याची सरकारची तयारी यासंदर्भात मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे.

उद्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज (३० एप्रिल २०२१ )उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे शासनाच्या उपाययोजनाही कोरोनाची साखळी तोडण्यात तोकड्या पडत असल्याचं चित्र निर्माण झाल आहे. राज्यातील वाढत्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशभरात उद्यापासून १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनाच्या पार्शवभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सावात मोठी दुर्घटना

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व  जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या  जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. आज ते कोविड  परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

Exit mobile version