उद्धव ठाकरेंकडून ‘सोशल डिस्टंसिंग’चा प्रयत्न

उद्धव ठाकरेंकडून ‘सोशल डिस्टंसिंग’चा प्रयत्न

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील नवे फोटो आणि व्हीडिओ समोर आल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्याकडून संजय राठोडचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता वाढली आहे. संजय राठोड बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी संजय राठोडना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पावणे दोन तास ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी संजय राठोडशी केवळ दोन मिनिटं जुजबी चर्चा करुन काढता पाय घेतला.

संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेला तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यग्र होते. त्यामुळे संजय राठोडना बराच काळ वाट पाहावी लागली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते नितीन राऊत हेदेखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र, संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबाबत माहिती नाही. मात्र, एकूणच घटनाक्रम पाहता आगामी काळात शिवसेना नेतृत्त्वाकडून संजय राठोड याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जींना देश तोडण्यासाठी पत्र

पोहरादेवी येथे गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत आता शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. संजय राठोड बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही स्थानिक शिवसैनिक हजर नव्हता. विशेष म्हणजे संजय राठोड हा नागपूरचे संपर्कमंत्री आहे. तरीही संजय राठोडच्या स्वागतासाठी एकही शिवसैनिक न येणे, ही सूचक बाब मानली जात आहे.

Exit mobile version