26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे तुमची नैतिकता कुठे आहे?

उद्धव ठाकरे तुमची नैतिकता कुठे आहे?

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अखेरीस राजीनामा दिला. केंद्रिय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. सविस्तर वाचा काय म्हणाले मंत्रिमहोदय या पत्रकार परिषदेत ते.....

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यानंतर विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रिय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी देखील पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले की यापूर्वी झालेल्या परिषदेत आम्ही, एका मंत्र्याचं एका शहराचं टार्गेट शंभर कोटी असले तर इतर मंत्र्यांचं टार्गेट काय याबाबत माहिती मिळायला हवी असं म्हटलं होतं. त्याबरोबरच या प्रकरणात मुख्यमंत्री गप्प का? त्यांचं मौन अनेक प्रश्न वाढवणारं आहे असेही ते म्हणाले.

ते असेही म्हणाले की, शरद पवार म्हणतात राजिनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार आणि शिवसेना- काँग्रेस म्हणते की देशमुखांबाबत एनसीपी निर्णय घेईल. आज मात्र कमाल झाली. आज शरद पवारांच्या परवानगीने देशमुखांनी राजिनामा दिला. त्यामुळे नक्कीच बात निकलेगी तो दूर तक जाएगी. असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री?

अनिल देशमुखांचा राजीनामा हे केवळ हिमनगाचं टोक

सचिन वाझे प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, एनआयएने आत्तापर्यंत ८ गाड्या पकडल्या असून या बाबत त्यांच्याकडून कडक तपास चालू आहे. त्यामुळे, भाजपाची अपेक्षा आहे की सीबीआय तपासातून या प्रकरणाचे सगळे कांगोरे उघडकीस यावेत. देशमुखांची मागणी कोणासाठी होती हा यातला गंभीर प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.

त्याबरोबरच त्यांनी हे देशाच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे सांगितले. ते म्हणाले की, एखादा पोलीस आयुक्त गृहमंत्र्यावर एपीआयला वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करतो हे स्वातंत्र्यानंतर प्रथमच घडले आहे.

त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सरकार वसूली आघाडी असल्याचे म्हटले. त्याबरोबरच त्यांनी मुख्यमंत्री तुमची काही नैतिकता आहे की नाही? असा परखड सवालही केला. ते म्हणाले की, जर मंत्री नैतिकतेच्या आधारावर राजिनामा देतो असे म्हणतो तर, उद्धव ठाकरे तुमची नैतिकता कुठे आहे?

त्याबरोबरच शासन करण्याच्या नैतिक अधिकारापासून उद्धव ठाकरे आपण ढळले आहात असा टोलाही त्यांनी लगावला. सचिन वाझे प्रकरण आणि खंडणी प्रकरण अशा दुहेरी कात्रीत ठाकरे सरकार अडकले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

हे लुटीचे मोठे षडयंत्र असल्याचे देखील त्यांनी सांगितले. देशातील कोणत्याही स्फोटकांचे प्रकरण एनआयएकडेच जाते त्याबरोबरच त्याच्याशी जोडलेली केस सुद्धा एनआयएकडेच दिली जावी असा कायदा आहे आणि मनसुख हिरेन यांची केस पोलिस द्यायला तयार नव्हते असे देखील त्यांनी सांगितले.

एकूणच हा गंभीर मामला असून याची सखोल चौकशी व्हावी. याचे सगळे धागेदोरे समोर यावेत अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी पवारांना टोला देखील लगावला. पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे देशमुखांना क्लिन चिट देण्याचा पवारांना अर्थ कळायला हवा होता. असे ते म्हणाले.

यावेळी राज्यात दोन ऑपरेशन एकत्र चालू असल्याचंही ते म्हणाले, एक लूट ऑपरेशन आणि व्हाईट वॉश ऑपरेशन एकत्र चाललं होतं. असेही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच या प्रकरणात सीबीआयच्या तपासाची वाट बघू असेही त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा