सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपचे नेते असे चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी राणे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी. @CMOMaharashtra@OfficeofUThttps://t.co/SklDkFH0bz
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 6, 2021
“आपण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करुन दाखवावी, अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे.” असे ट्वीट नारायण राणे यांनी केले आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी राणेंना हा टोला लगावला. अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. नारळ फोडतात आणि पुढे काम होत नाही. पण आपल्या सरकारकडून तसं होणार नाही. ज्या योजना होणाऱ्या असतात त्याचीच आपण घोषणा करतो. अशी टिका उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर केली होती.