मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसलाय. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दूरदृष्य प्रणाली जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र सरकारला टोलवला. त्यावरूनच आता भाजपा नेते नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या आडून आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
मुख्यमंत्री साहेब ..
तुमच्या आदित्य किवा तेजस चे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते..
त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते..
तर..मग..
मराठा आरक्षण नक्कीच टिकवले असते!!!— nitesh rane (@NiteshNRane) May 5, 2021
भाजपा नेते नितेश राणेंनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या एफबी लाईव्हवर टीकास्त्र सोडलं. आताच झालेल्या मुख्यमंत्री एफबी लाईव्ह नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया.. आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त.., असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरच हल्लाबोल केलाय.
आताच झालेल्या मुख्यमंत्री FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया..
आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त..
🤨🤨🤨
— nitesh rane (@NiteshNRane) May 5, 2021
विशेष मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निकालानंतरही त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मुख्यमंत्री साहेब.. तुमच्या आदित्य किवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते. त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते..तर..मग..मराठा आरक्षण नक्कीच टिकवले असते!!!, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
हे ही वाचा:
माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे कोरोनामुळे निधन
शोपियानमध्ये तीन घुसखोरांचा खात्मा
काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचे नव्हते
भाजपाला श्रेय मिळू नये म्हणून आघाडी सरकारने आरक्षण घालवले
सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना पुढचा मार्ग दाखवलेला आहे. कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेलं आहे. माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना हात जोडून विनंती करतोय. आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. आपण काश्मीरचं ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली. तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहिजेय, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारला आवाहन केलं.