उद्धव ठाकरेंचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे

उद्धव ठाकरेंचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहिहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. दहिहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी यंदाही दहीदंडीला परवानगी दिलेली नाही. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही या विषयावर ट्विट करून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली. या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये.” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांनं करावा लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना.”

हे ही वाचा:

लसीचे दोन्ही डोस घेऊनही दहीहंडीला परवानगी नाहीच

जातिनिहाय जनगणनेबाबत लवकरच निर्णय

महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान

काबुल विमानतळावर चेंगराचेरीत जिवीत हानी

गोविंदा पथकांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत तर काही आश्वासनं ही दिली आहेत. “आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे. गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

Exit mobile version