उद्धव ठाकरे, शरद पवार पाठीत खंजीर खुपसणारेच

उद्धव ठाकरे, शरद पवार पाठीत खंजीर खुपसणारेच

महाराष्ट्राच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एकच चेहरा होता, आता दोन चेहरे झालेत, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर केलेलं भाष्य हे वास्तववादी असल्याचे मत राज्याच्या पंचायतराज समिती दौऱ्यावर असणारे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.

सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहलंय की शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे. परंतु ज्यावेळी कृषी विषयक सभागृहात आले त्यावेळी मात्र त्यास मूक संमती दिली. त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला. त्यांची जी कुटणीती आहे ही महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणून देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिले जात नाही.

शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत, हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहित झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहित झाली आहे. म्हणून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाशी मी सहमत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुख यांनी दरोडा घालयचा आणि पोलिसांनी काय हार घालयचा का?

अनिल देशमुखांच्या वकिलालाच अटक

बिग बॉस १३ चा विजेता कालवश

माजी खासदार चंदन मित्रा कालवश

उद्धव ठाकरेंनी २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाला फसवून सत्तेच्या मोहापायी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी सोबाद जाऊन बसले.

Exit mobile version