हिंदुत्व, फोडाफोडीचे राजकारण यावरून उद्धव ठाकरेंचे टोमणे

ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे टोमणेअस्त्र

हिंदुत्व, फोडाफोडीचे राजकारण यावरून उद्धव ठाकरेंचे टोमणे

मुंबईतील रंगशारदा सभागृहात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपावर निशाणा साधला. हिंदुत्व, फोडाफोडीचे राजकारण या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी टोमणे मारले.

“इंडिया, भारत, भारतमाता ही देशाची नावं आहेत. नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही परदेशात जाता, बायडनला मिठी मारता, यांना मिठी मारता, त्यांच्याशी हस्तांदोलन करता. बाजूला उभे राहता, आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. पण तेव्हा तुमची ओळख ही प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशी केली जाते. तेव्हा तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावातही इंडिया होतं, असं म्हणत पीएम मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया या आघाडीवर निशाणा साधला होता.

भाजपात राम राहिला नाही, आहेत ते सर्व आयाराम आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्या हृदयातला राम तुम्ही काढू शकत नाही. तुमचा आयारामांचा पक्ष झाला आहे. राम मंदिर बांधा, पण तुम्ही आयारामांचे मंदिर बांधलं आहे, त्याचं काय? असा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावला.

एनडीएतील नेत्यांना नरेंद्र मोदी सांगतात की, मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरा करा. पण, हिमंत असेल तर मणिपूरमध्ये ज्या महिलांची धिंड काढली त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करा. मुस्लिम महिलांकडून राखी बांधायची असेल तर बिल्कीस बानो यांच्याकडून आधी राखी बांधून घ्या. तिच्या गुन्हेगारांना गुजरात सरकारने सोडले. सन्मान केला आणि हे मला हिंदुत्व शिकवतात. यांच्या हिंदू ढोंगाला लाथ मारून मी बाहेर पडलो. आमचं हिंदुत्व मुखवटेधारी नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नाही. आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हवा, जगातील सर्वात शक्तीमान नेता विश्वगुरु राज्य करत असताना हिंदूंना जन आक्रोश करावा लागत आहे. भाजपची साथ सोडली हिंदुत्व सोडलं नाही, नऊ वर्षात शक्तीमान असलेला नेता असताना हिंदू खतरे मे है अशा घोषणा येतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

आणखी किती पक्ष फोडून उपमुख्यमंत्री करणार आहात? देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री करणार का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. देवेंद्र फडणवीस यांची दया येते, की ते आणखी किती ओझी वाहणार? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

चांद्रयान लागले कामाला; चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना नको आहे ‘हिंदीची गुलामगिरी’

नूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा ‘आप’ नेत्यावर आरोप

ज्या इमारतीतून दगडफेक झाली त्या नूँहमधील हॉटेलवर बुलडोझर

अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडणारा औरंगजेब जीवंत आहे. ही औरंग्याची वृत्ती भाजपमध्ये आहे. अशी वृत्ती महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. महाराष्ट्र हे मराठ्यांचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version