ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातून उद्योग, व्यवसाय इतर राज्यात नेल्याचे म्हटले. तसेच शिवसेना फोडल्याचा आरोप त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपावर केला. यावेळी त्यांनी मणिपूर मुद्द्यावरही भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांची सुटका करण्यासाठी म्हणून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविले होते. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. “युद्ध थांबवलं असेल, पण मणिपूर एक वर्षापासून का धुमसतय? ते का नाही थांबवलं?” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मणिपूर अजून अशांत का आहे? मतदानाच्या दिवशी तिथे हिंसाचार झाला. ज्या पद्धतीने महिलांची धिंड काढली, तिथले मुख्यमंत्री म्हणाले, असे बरेच प्रकार झालेत. स्वत: गृहमंत्री जाऊन आले त्यांना माहित नव्हतं का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“ते व्हिडिओ बाहेर आले नसते, तर जगाला कळलच नसतं. दडपशाही सुरु आहे. मणिपूर अजूनही अशांत आहे, त्याबद्दल कोणाच्या मनात संवेदना दिसत नाहीय. मतं मागताना मला लाज वाटते, तिथल्या महिलांवर, लोकांवर काय परिस्थिती उदभवली असेल, त्याबद्दल कोणाच्या मनात संवेदना नाहीय” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे मोफत धान्य वाटपावर म्हणाले की, “तुम्हाला माझ्यावर अवलंबून रहावं लागलं, म्हणजे तुम्ही माझे गुलाम झालात. याचाच अर्थ त्यांना देशाला गुलाम बनवायचं आहे. मी खायला दिलं, तरच त्यांच पोट भरेल, नाहीतर पोट भरण्याच साधन ठेवणार नाही. उद्योगधंदे पळवून नेणार. रोजच्या खाण्यापिण्यासाठी तुम्हाला माझ्या दारासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं रहाव लागेल. मग, तुम्ही मला नाकारु शकत नाही, हीच भीती आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणूक: चौथ्या टप्प्यात ९६ मतदारसंघाचे भवितव्य मतपेटीत होणार बंद
केजरीवाल चीनकडून जमीन मिळवून देणार!
‘मोदींशी चर्चा करायला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय?’
बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० वर्ष सत्तेत आहेत, त्यांच्या कार्याचा डंका वाजवला जातोय, त्यांची पाच कामं आठवतायत का? यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले, पक्ष फोडले, कुटुंब फोडली, भ्रष्टाचाऱ्यांना स्थान दिलं, निवडणूक रोखे जमवले आणि जनतेला फसवलं, अशी टीका त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर केली.