निरुत्साहाची मास्टर सभा

निरुत्साहाची मास्टर सभा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बिकेसी येथील सभेची फार मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली. हजारो शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या सभेला आले आहेत असा प्रचार शिवसेनेकडून केला गेला. केलेल्या दाव्यांप्रमाणे सभेला गर्दी दिसत होती. पण जमलेल्या सर्व नागरिकांमध्ये उत्साह मात्र बिलकुल दिसला नाही.

शिवसेनेकडून सभेचे वर्णन करताना १०० सभांचा बाप किंवा बांद्र्यापासून सुरू झालेली गर्दी कुर्ल्यापर्यंत आहे अशाप्रकारे करण्यात आले. पण सभेला जमलेली गर्दी कुठल्याच प्रकारे नेत्यांच्या भाषणांना दाद देताना किंवा प्रतिसाद देताना दिसत नव्हते.

हे ही वाचा:

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

माणिक सहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

हिंदुत्वाच्या नावावर हिंदू संघटनांवरच टीका! कारसेवकांचाही अपमान

मुख्यमंत्री फडणवीस, सोमय्यांबद्दल बोलताना ‘घसरले’!

ना उद्धव ठाकरे यांच्या एखाद्या विनोदावर फार हषा पिकताना दिसला, ना वाक्यांवर मोठ्या प्रमाणात टाळ्ये पडताना दिसल्या. उद्धव ठाकरे यांच्या विजयाची घोषणा देतानाही सभेतील जमाव हा म्हणावा तसा प्रतिसाद देताना दिसला नाही. जणू काही जबरदस्तीने ही गर्दी सभेला आणून बसवली आहे असे चित्र पाहायला मिळाले.

नेमक्या याच मुद्द्यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “भाषण सुरू झाले, पण एक टाळी नाही की घोषणा नाही. शिवसैनिक सुद्धा कंटाळले त्याच वाफा ऐकून…” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version