आमदार निघून गेले आता नगरसेवकांना साकडे

आमदार निघून गेले आता नगरसेवकांना साकडे

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आगामी पालिका निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी आता नगरसेवकांना साकडे घातले आहे. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, असे आर्जव त्यांनी नगरसेवकांना केले आहे.  उद्धव ठाकरे यांनी जनतेशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंनी शुक्रवार, १२ ऑगस्ट रोजी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली आहे.

शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनमध्ये घेतली. यावेळी त्यांनी मुंबई जिंकणारच असा दावा माजी नगरसेवकांसमोर केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मुबंई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजपाची मुंबई महापालिकेमध्ये सत्ता येईल, असा विश्वास भाजपाने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.

भाजपाच्या विरोधात लढूनही यापूर्वी आपण मुंबई राखली आहे, त्यामुळं आगामी निवडणूकही जिंकणारच, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. लोकांमध्ये राहून काम करणं हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे. ते करत राहा. वॉर्डांमध्ये फिरा, अशा सूचना त्यांनी कार्यकत्यांना केल्या आहेत.

हे ही वाचा:

‘मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार’

एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच

कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनाच यापुढे अटल पेन्शन

काँग्रेस आमदाराला हिट अँड रन प्रकरणी अटक

शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी उठाव करत भाजपासोबत गेले असल्याने नगरसेवक फुटण्याचीही भीती शिवसेनेला आहे. त्यामुळंच कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, असं आवाहन उद्धव यांनी यावेळी केलं. या बैठकीला १३ माजी नगरसेवक अनुपस्थित होते. मात्र, त्यांनी अनुपस्थितीची कारणं कळवली होती, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Exit mobile version