शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेला पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत.
उद्धव यांच्या या वागण्यातही बदल झाला आहे. उद्धव ठाकरे सहसा मुंबईबाहेर फारसा प्रवास करत नाहीत, जेव्हा कधी आपत्ती आली किंवा मोठा राजकीय मेळावा असेल तेव्हा ते मुंबईबाहेर जायचे पण आता ही विचारसरणी बदलली आहे. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हे राज्यभरातील अनेक शहरांमध्ये शिवसंवाद यात्रा करत आहेत. पुढील महिन्यातही आपण राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे उद्धव यांनी जाहीर केले आहे.
आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर आता उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरणार आहेत.गणेशोत्सवानंतर शिवसेना राज्यभर महाप्रबोधन यात्रा काढणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृह मतदारसंघ असलेल्या ठाण्यात जाहीर सभा घेऊन याची सुरुवात करणार आहेत.
हे ही वाचा:
एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने
इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”
सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी
उद्धव ठाकरे यांची ही सभा ठाण्यातील टेंभी नाका येथे होणार असून पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने महाप्रबोधन यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेचा समारोप कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे.
माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे हेही राज्याच्या दौऱ्यावर असून शिवसंवाद यात्रा काढून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा शिंदे गट (एकनाथ शिंदे) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमनेसामने येणार आहे.