मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी उठाव केला. उठावानंतर उद्धव ठाकरेंसोबत केवळ पंधरा आमदार आहेत. या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंनी भावनिक पत्र लिहले आहे. आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे शिवसेनेला बळ मिळाले, अशा स्वरूपाचे भावनिक पत्र उद्धव ठाकरेंनी आमदारांना लिहले आहे.
पत्रात उद्धव ठाकरे म्हणतात की, शिवसेना आपला परिवार आहे. आजही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वस्व आहेत. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्यला बाळासाहेब यांनीच शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्मानीय आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत, अश्या प्रकारचे पत्र उद्धव ठाकरेंनी पंधरा आमदारांना पत्र लिहले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांच्यासह वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रवींद्र वायकर, उदयसिंह राजपूत, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, नितीन देशमुख, कैलास पाटील आणि राहुल पाटील हे आमदार आहेत.
हे ही वाचा:
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरची सुनावणी पुढे जाणार?
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
‘आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर केला’
जोकोविचने विम्बल्डन जेतेपदावर सातव्यांदा कोरलं नाव!
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत उठाव केला. त्यावेळी उद्धव ठाकरे त्या आमदारांनाही भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन करत होते. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे हे त्यांच्यावर आरोप, टीका करत होते.