महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ‘उद्धव ठाकरे यांचा इगो होता’ असे म्हणत राज्यपालांचे समर्थन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी बारा आमदारांच्या नियुक्तीचे पत्र जे दिले ते धमकी वजा पत्र होते असा गौप्यस्फ़ोट राज्यपालांनी केला होता. त्यावरतीच उपमुख्यमंत्र्यांनी, ‘त्यांनी जे सांगितले ते योग्यच असल्याचे म्हटले आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर गेल्या दोन वर्षांपासून विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीवरून उलटसुलट चर्चा होती. अशातच भगतसिंह कोश्यारी यांनी विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
कोश्यारी यांनी म्हंटले आहे की, जे बारा आमदारांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते त्यातून मला अप्रत्यक्ष धमकीच दिली होती. त्यामुळेच त्या बारा आमदारांची नियुक्ती केली नसल्याचा यावेळेस खुलासा करून जो फॉरमॅट असायला हवा त्याची मागणी राज्यपाल यांनी केली आहे. ज्यावेळेस माविआ नेते राजभवनात राज्यपालांना भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांनी योग्य फॉरमॅट मध्ये पत्र पाठवा असे सांगितले. त्यावेळेस त्यांचा इगो असल्यामुळे त्यांनी आम्ही बदलणार नाही असे सांगितले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात..शिवालयही येणार
आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा
रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!
माविआच्या काळात राज्यपाल विरुद्ध सरकार असा कलगी तुरा सगळ्यांनीच बघितला. तेव्हाच बारा आमदारांचा मुद्दा हा एक मुख्य चर्चेचा विषय होता. आता तर सरकार पण गेले आणि राज्यपाल सुद्धा बदलले तरीही बारा आमदारांचा प्रश्न अजून मार्गी लागला नाही. माविआ सरकारच्या काळांत अनेकदा बारा आमदारांची नावे बदलण्यात आल्याचे राज्यपालांनी सांगितले. एवढेच नाही तर ते पत्र देत असताना १५ दिवसांची मुदत मुख्यमंत्री मला देऊन आदेश देत असत. त्यांनी मला धमकी दिल्याने मी त्या नावांची नियुक्ती केली नाही असे त्यांनी जाहीर केले.
या सगळ्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरोबरच आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे आणि माजी राज्यपालांचे समर्थन केले आहे. आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.