मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना लढण्यासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे.या जागेसाठी महायुतीकडून मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यशवंत जाधव निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.परंतु, महायुतीकडून अद्याप घोषित करण्यात आले नसून, शिवसेना शिंदे गटाला दक्षिण मुंबईची जागा मिळण्याची शक्यता आहे.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिलिंद नार्वेकरांना लोकसभेसाठी ऑफर देण्यात आली आहे.जर मिलिंद नार्वेकर यांनी पक्ष सोडल्यास ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो.मिलिंद नार्वेकर हे बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पक्षासाठी काम करत आहेत.तसेच नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर ठाकरेंबाबत आणखी काही गुपित माहिती बाहेर पडू शकते, ज्याने उद्धव ठाकरेंची गोची होऊ शकते.
हे ही वाचा:
‘आप’चा खोटारडेपणा उघडकीस; उपराज्यपालांचा दावा!
‘रेहान बीफ शॉप जिंदाबाद, कत्तल करत रहा’
भारतीय महिला कुस्तीपटूंची कामगिरी!
गाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू; बहीण जखमी!
दरम्यान, मिलिंद नार्वेकर ही ऑफर स्वीकारून उद्धव ठाकरेंना धक्का देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.तसे झाल्यास मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.