मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांकडे येणार का सरकारी पाहुणे?

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांकडे येणार का सरकारी पाहुणे?

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याने बेनामी कंपनीत गुंतवणूक केली तर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावेच लागेल ना’ असे म्हणत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी नवा गौप्य्स्फोट केला आहे. माध्यमांशी बातचीत करताना किरीट सोमैय्या यांनी ही नवी तोफ डागली आहे. त्यामुळे आता सोमैय्यांच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर केंद्र सरकारचे पाहुणे मुख्यत्र्यांच्या मेव्हण्यांकडे येऊ घातल्येत का? असाही सवाल विचारला जात आहे.

भाजपा नेते किरीट सोमैय्या हे गेल्या काही काळापासून महाराष्टरातील ठाकरे सरकारच्या मागे हात धुवून लागले आहेत. किरीट सोमैय्या हे ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे आणत असून त्या संदर्भात निरनिराळ्या यंत्रणांकडे तक्रार करतानाही दिसत आहेत. यातच आता आणखीन एका नावाचा समावेश होणार अशी चिन्हे दिसत आहेत. किरीट सोमैय्या यांनी शनिवार, १६ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावरच निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्याच्या मेव्हण्याची बेनामी कंपनीत गुंतवणूक असल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा:

लखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात

महाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार का?

वाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

या आधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते किरीट सोमैय्या यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. तर नुकत्याच अजित पवार यांच्या कुटुंबियांवर झालेल्या आयकर विभागाच्या कारवाईवरूनही सोमैय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या कुटुंबियांशी निगडित झालेल्या छापेमारीचा अंतिम रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. हा १०० कोटीचा गैरव्यवहार असल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. तर यात अजित पवार यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, बहीण अशा १५ मोठ्या सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

Exit mobile version