तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

उद्धव ठाकरे यांच्या अडचणी संपेनात

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हातातून निसटल्यानंतर रिकामा भाता उरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या अडचणी काही संपायला तयार तयार नाहीत. ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. ठाकरे गटाला देण्यात  आलेले मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावही गमावण्याची वेळ आली आहे.

चिन्ह आणि नाव आता ठाकरे गटाला फक्त २६ फेब्रुवारीपर्यंत वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीपर्यतच हे चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गट पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहेत.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क सांगितला होता. त्यानंतर  निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवलं होतं. त्यावेळी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तात्पुरते बहाल केले होते.

ठाकरे गटाच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं होतं. शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं होतं.अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाच्या नावावर अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत बंदी घातली होती. त्यातच समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केल्याने ठाकरे गटाच्या अडचणी जास्त वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाला दिलेले चिन्ह गोठवण्याची मागणी समता पक्षाने केली आहे. या संदर्भात उदय मंडल यांच्या नेतृत्वाखाली समता पक्षाचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे.

हे ही वाचा:

आता इंटरनेटशिवाय मोबाईलवरच बघा टीव्ही

शिवसेना, चिन्ह शिंदेंकडे गेल्यावर राज ठाकरे यांनी शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हीडिओ

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस शनिवारी घेणार शपथ

मशाल हे आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे आणि पक्षाने या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मशाल हे राखीव निवडणूक चिन्ह असल्याचे समता पक्षाने दावा केला होता हा दावा उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाने हा दावा केला होता. या संदर्भातील समता पक्षाने केली याचिका न्यायालयाने त्यावेळी फेटाळून लावली होती. पण आता पुन्हा समत पक्ष हे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहे.

Exit mobile version