27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणअगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळल्याचे दिसलेले नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयातही गेलेले नाहीत. आपण घरूनही काम करू शकतो, हे त्यांनी ठणकावून सांगितले होते. मानेच्या कण्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते बाहेर पडलेले नाहीत पण अगदी मोजक्या कार्यक्रमांत ते उपस्थित राहिले. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. हिवाळी अधिवेशनातही ते उपस्थित राहिले नव्हते. पण आता शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी ते महाराष्ट्रात दिसणार आहेत. आपल्या खासदारांशी ऑनलाइन बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात एकामागोमाग एक काहीतरी घडत आहे. आपण त्या संकटांना तोंड देत आहोत. त्यामुळे मला एकाच जागी बसावं लागतं आहे. पण तिथे बसून मी राज्याचे काम पुढे नेत आहे. तुम्हीही महाविकास आघाडीचे विचार लोकापर्यंत न्या. विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्या.

हे ही वाचा:

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा

‘१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची पुन्हा CBI चौकशी करा’

अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

जोझिला पास (रस्ता) पुन्हा वाहतुकीसाठी खुला! BRO ची ऐतिहासिक कामगिरी

 

एमआयएम या पक्षासह शिवसेनेची युती होणार का, यावरून रान उठलेले असताना यापक्षासोबत आम्ही युती करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यावेळी त्यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची वक्तव्ये दाखवून भाजपावर टीका केली.

येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचे हे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. त्यासाठी खासदार व जिल्हाप्रमुखांशी त्यांचा हा संवाद झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा