खासदार राहुल शेवाळेंच्या वक्तव्यांने नव्याने चर्चा
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अनेक विषय उघड केले.
शिवसेनेतल्या १२ खासदारांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा शेवाळे म्हणाले की, आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यावर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बैठकीला बोलावले. तेव्हा पक्षासोबत राहू असे आम्ही त्यांना सांगितले. २०१९ची निवडणूक एनडीए माध्यमातू लढविली आहे. दोन वर्षे त्रास होतो आहे. तेव्हा उद्धवरावांनी भूमिका मान्य केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी भूमिका स्वीकारेन, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी स्वागत करेन, असेही त्यांनी सांगितले होते.
शेवाळे म्हणाले की, मग दुसरी बैठक झाली. चार पाच बैठका झाल्या. सर्व खासदारांना २०२०४ची निवडणूक लढवायची तर युती करावी लागेल असा आग्रह धरला. तेव्हा उद्धवजी म्हणत होते की, आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवूया. आम्ही अरविंद सावंत यांना या अडचणी सांगितल्या. पण तिथून प्रतिसाद मिळाला नाही.
एनडीए सोबत जायचे असेल तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला हवा, असे आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले, असे शेवाळे यावेळी म्हणाले. त्यावेळी उद्धव यांनी सांगितले की, युती करायची आहे. आपण प्रयत्न केला. मोदींना भेटायला गेलो तेव्हा मोदींकडे उल्लेख केला. एक तास चर्चा झाली. शेवाळे म्हणाले की, पण जुलैला अधिवेशन होते. त्यावेळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांवर कारवाई केली. त्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज झाले. युतीची चर्चा करताना ही कारवाई का, असा सवाल उपस्थित केला गेला. कित्येकवेळा युतीची चर्चा केली, भाजपाला मात्र शिवसेनेकडून सहकार्य मिळाले नाही. चार पाच खासदारांसह शिंदे फडणवीसांना भेटलो. पण पूर्तता न केल्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठी नाराज होते. हे चालत असताना संजय राऊत यांच्या माध्यमातून मविआ यांच्यासोबत बैठका सुरू होत्या. त्यामुळे खासदारांमध्ये नाराजी झाली.
हे ही वाचा:
नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या
लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती
स्विमिंग पूलमध्ये पडून लहानग्याचा मृत्यू; धक्कादायक व्हीडिओ व्हायरल
महाराष्ट्राच्या ‘त्या’ सुपुत्राने केला लेह ते मनाली पायी प्रवास
वेळोवेळी आम्ही एनडीए, युतीसाठी विनंती केली पण जो सकारात्मक प्रतिसाद हवा तो मिळाला नाही. मविआचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न झाला. अरविंद सावंत हे एनडीएच्या कॅबिनेटमधून बाहेर पडले पण अद्याप शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडल्याचे कोणतेही पत्र दिलेले नाही. त्यामुळे अजूनही आम्ही एनडीएसोबत आहोत, असेही शेवाळे म्हणाले.
यावर अरविंद सावंत, खासदार संजय राऊत यांनी मात्र विरोधी मत व्यक्त केले. आम्ही एनडीएसोबत नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले म्हणजे आम्ही एनडीएसोबत नव्हतो हे स्पष्ट होते, असे राऊत आणि सावंत म्हणाले.