उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले

आमदार आणि भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले खोचक ट्विट

उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले

काल उद्धव ठाकरे गटाचे दोन उपनेते विठ्ठल गायकवाड आणि सुहास सामंत यांच्यात मोठ्याप्रमाणांत त्यांच्याच पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांच्या पुढ्यातच चांगलीच जुंपली आणि पक्ष सभेतच हे घडल्यामुळे सगळ्यांनाच ही खडाजंगी बघायला मिळाली. याबाबत लुटीच्या मालाच्या वाटणीवरून सरदारासमोरच वाद झाला की काय?’   भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकरांनी यावर खोचक टीका केली आहे.

या बैठकीत बघल्याला मिळाले. याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, उद्धव ठाकरे यांनी काल उपनेत्यांची बैठक बोलावली होती. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्यांची आज बैठक झाली.आणि त्या बैठकीत ही खडाजंगी विठ्ठल गायकवाड आणि सुहास सामंत यांनी पक्षाच्या नेतृत्वापुढेच काही प्रश्न उपस्थित केले. या बैठकीत चांगलीच खडाजंगी सगळ्यांसमोरच घडली. पक्षांच्या नेत्यांसमोरच काही प्रश्न उपस्थित केल्याने हा वाद झाला. या वादानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना समाज दिली. वाद टाळून कमला लागण्याच्या सूचना वजा समज त्यांनी सगळ्यांना दिल्या.

हे ही वाचा:

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?

आता चिल्लर घ्यायला एटीएममध्ये जा!

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही फक्त उपनेते पदी आहोत पक्षांत आमचा उपयोग होत नाही पक्ष संघटनांपर्यंत आमहाला ठेवण्यात येते. अशी उद्विग्नता त्यांनी आपल्या नेत्यासमोर ठेवली. शिवसेनेच्या या उपनेत्यांना चा वाद उद्धव ठाकरेंसमोरच बाहेर पडला. आणि एकमेकांची त्यांची आपसात जुंपली.

काय घडले नेमके?

विठ्ठल गायकवाड यांनी २०१७ साली शिवसेनेत पक्षाचा उपनेते म्हणून प्रवेश करून ते बेस्ट इलेक्ट्रिक कामगार संघटनेचे नेतृत्व करतात तिथे त्यांचा पक्षाचे उपनेते म्हणून काहीच उपयोग का करून नाही घेतला. असा सवाल त्यांनी यावेळी विचारला तर, श्रीकांत सरमळकर यांचे पुतणे कुणाल सरमळकर हे याच कामगार संघटनेतील एका नेत्याने कामात मदत करून त्याचीच युनिअन अधिकृत असल्याचे चित्र सगळ्यांसमोर आणले. असेही गायकवाड पुढे म्हणाले. कुणाल सरमळकर आता शिंदे गटात गेले आहेत. या विधानाला बेस्ट कामगार संघटनेचे नेते सुहास सामंत यांनीही दुजोरा देत आपल्याला सुद्धा असेच अनुभव आल्याचे सांगत त्यांनीही गायकवाडांच्या सूर आळवला.

या बैठकीत विठ्ठल गायकवाड यांच्या कामगार संघटनेला अजूनही अधिकृत मान्यता मिळाली नसल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रणित कामगार संघटना यांच्या नेत्यांमध्ये असलेला विसंवाद या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पुढ्यातच घडून आला. या सभेला भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि खासदार अरविंद सावंत हे सुद्धा  बैठकीला उपस्थित होते. या उपनेत्यांचे वाद हे बैठकीत वाढतच गेल्याने या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना दोन्ही उपनेते विठ्ठल गायकवाड आणि सुहास सामंत यांना समज देण्यात आली.

याच बैठकीत जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी आपल्या पक्षाचे उपनेते काय काम करतात असे आपल्या निवेदनात विचारले आहे. शिवसेना पक्षातील ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्यावर ठाकरे गटातील अनेक नेते,उपनेते यांची हि खडाजंगी सध्या दर एक दोन दिवसांमध्ये सगळ्यांना दिसून येते.

Exit mobile version