महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात आरडाओरडा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग काढला.
उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात आपल्या पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, एकतर देवेंद्र फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन. नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांनी आव्हान दिले की प्रचाराला या गुर्मी उतरवतो. भाजपने त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुंबई भाजपच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक जुना व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओसोबत उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिण्यात आले आहे की, ‘उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…’, असं कॅप्शन देत भाजपने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस मीडियाला बाईट देताना दिसत आहेत. ते त्यात म्हणतात की, “माझा एक सिद्धांत पक्का आहे. मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणी नादी लागलं तर सोडत नाही”.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंच्या आरडाओरड्यानंतर त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि उद्धव ठाकरेंना वैयक्तिक शोभत नाही. महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून तुमचे मानसिक खच्चीकरण झाले, ते जनतेसमोर येत आहे”, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार म्हणून म्हटले जात होते. आपले सरकार आल्यावर प्रकल्प स्थगित केले जातील असे पुन्हा उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
सी.पी.राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ !
वायनाड दुर्घटनेवर अमित शहा म्हणाले, ‘इशारा देऊन देखील केरळ सरकारचे दुर्लक्ष’
‘अरविंद वैश्यच्या हत्येमागे बड्या गँगचा समावेश; उद्धव ठाकरे हे जिहाद्यांचे आका’
सत्तेवर आल्यावर धारावीचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आदानींचे टेंडर रद्द करु, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.