उद्धव ठाकरे म्हणाले, हा माझा प्रतिकात्मक दौरा

संभाजीनगरला अर्ध्या तासाचा धावता दौरा

उद्धव ठाकरे म्हणाले, हा माझा प्रतिकात्मक दौरा

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी २३ ऑक्टोबरला संभाजीनगरला धावता दौरा केला. अवघ्या अर्ध्या तासाच्या दौऱ्यात त्यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हा माझा प्रतिकात्मक दौरा आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मी आलो आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ही माझी प्रतिकात्मक भेट आहे. सध्या आपण विचित्र अवस्थेत आहोत. दिवाळी आहे पण शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय. कपडे कोणते घालायचे, अन्न काय शिजवायचं हा अन्नदात्यापुढील प्रश्न आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असे बाहेर का पडले नाहीत असा सवाल उद्धव ठाकरे यांना त्यांचे राजकीय विरोधक विचारत आहेत, असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी घर सोडलं आणि घर घर करत फिरत आहेत त्यांनी असले प्रश्न विचारू नयेत.

हे ही वाचा:

गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

केनियात बेपत्ता असलेल्या दोन भारतीयांची हत्या

 

या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत यावर बोलण्यापेक्षा सरकारवर टीका करण्याला प्राधान्य दिले. गद्दारीचा पाढा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी वाचला. उद्धव ठाकरे यांनी इथे कोणतीही मागणी न करता शेतकऱ्यांनाच विचारले तुम्हाला किती मदत पाहिजे आणि मग ५० हजार हेक्टरी असे उत्तर काही उपस्थितांनी दिले.

ते म्हणाले की, ही भेट प्रतिकात्मक आहे. ऐन दिवाळीत सरकारला वेळ नसला तरी शिवसेना सोबत आहे. सोबत इतर मित्रपक्ष आहे. धीर सोडू नका. आत्महत्येचा विचार मनात आणू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेतकरी म्हणून एक व्हा. आसूड तुमच्याच हातात ठेवा तो वापरा. सरकारला घाम फोडला पाहिजे.

एका शेतकऱ्याच्या हातात आसूड (चाबूक) होता तो वारंवार उद्धव ठाकरे यांच्याजवळ नेण्याचा प्रयत्न केला जात होता. तेव्हा हा तुम्हीच वापरा. तुमच्या हातीच तो शोभतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version