राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धडा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने काढून टाकल्यावर भाजपाने यावरून काँग्रेसवर टीका केली. तसेच भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे, असा सवाल केला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात येत आहे. गेले काही दिवस हा विषय चर्चेत असूनही उद्धव ठाकरे गटाकडून मात्र प्रतिक्रिया आली नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला मत विचारले होते त्अयावर खेर मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्यक्षात युरोपात सुट्टी घालवण्यासाठी गेलेले उद्धव ठाकरे मात्र अद्याप यावर बोललेले नाहीत.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे पक्षासाठी आदर्श आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या प्रव्क्त्यांकडून देण्यात आली आहे. कर्नाटक राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धडे काढून टाकल्याबद्दल ठाकरे गटाने कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली.
ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या की, “आम्ही काँग्रेसशी युती केली असली तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. आमच्यासाठी स्वातंत्रवीर सावरकर हे एक आदर्श आहेत. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध करते. पाठ्यपुस्तकातून एखादा अध्याय काढू शकतात पण सावरकरांना लोकांच्या हृदयातून काढू शकत नाहीत.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हेडगेवार ही दोन्ही आदर्श व्यक्तीमत्त्व आहेत. सावरकर यांचे स्वांतत्र्य लढ्यातील योगदान कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. कर्नाटक सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत असा निर्णय घेणं म्हणजे दुर्भाग्य,’ असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
हे ही वाचा:
“इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”, अल्पवयीन मुलीला धमकी
ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक
मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त ट्वीटनंतर ठाणे पोलिसांनी मागितला नंबर
भाजपाने दार उघडलेले नाही, पण संकेत दिलेत…
‘सावरकर यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना अद्याप सत्यात उतरली नाही हे दुर्भाग्य आहे. पुढील २०- २५ वर्षांसाठी आपल्याला कार्य करायला हवे नाहीतर २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनेल,’ अशी प्रतिक्रिया सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी दिली आहे.
“महाविकास आघाडी कर्नाटक पॅटर्नबद्दल बोलत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना विचारायचे आहे की ते या कर्नाटक पॅटर्नशी सहमत आहेत का? सावरकरांच्या या अपमानावर ठाकरे यांचे काय मत आहे? धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्यालाही ते समर्थन देतात का?” असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.