शिवतीर्थावर झालेल्या भाषणात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे भावनिक आवाहन केले. ते म्हणाले की, ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. मर्द आणि एकनिष्ठ शिवसेनेची आहे. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत मी पक्षप्रमुख. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलेल गेट आऊट तर मी पायऱ्या उतरून जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खालच्या भाषेत उद्धव ठाकरे यांनी ऐकवले. मला पायऊतार व्हायचे सांगायचे ते तुम्ही. गद्दारांनी नाही. काय कमी केलं त्यांना. बाप मंत्री, कार्ट खासदार, कुणाचं आमदार. नातू नगरसेवक. सगळे माझ्याचकडे पाहिजे. मी का मुख्यमंत्री झालो, का केली आघाडी, ही लपून ठेवण्याची गोष्ट नाही. भाजपने पाठीत वार केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली.
शिवसैनिकांना मी सांगतो आहे की शांत राहा म्हणून ते आज शांत आहेत. शिवसैनिकांवरचा अन्याय सहन करणार नाही. मला हिंदुत्व शिकायची गरज नाहीये. भाजपाकडून हिंदुत्व शिकणार नाही. हिंदुत्व म्हणजे धोतर नाही पाहिजे तेव्हा सोडलं आणि नेसलं, असं उद्धव ठाकरे म्हणले. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही एकेरी टीका केली. पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व काय शिकवणार. काश्मीरमध्ये सत्तेच्या मोहापायी आतंकवादाशी संबंध असणाऱ्या त्या मुफ्ती बरोबर साटलोटं करणार तर तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार.
स्वतःकडे तेज असल्याचे सांगताना उद्धव म्हणाले की, आई जगदंबेने मला जी शक्ती दिली. त्याच्याशी तुम्ही पंगा घेतला. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, एक तेजाचा शाप असतो. हा सर्व तेजाचा शाप आहे. विचित्र गोष्ट अशी की ज्यांना आपण सर्व काही दिलं. मंत्रीपद, आमदार, खासदारकी ज्यांना दिली ते नाराज होऊन गेले.
हे ही वाचा:
खड्ड्यात लपवलेले ४० लाख हस्तगत
‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’
मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल
वऱ्हाडाची बस दरीत कोसळली २५ ठार
एकनाथ शिंदेंवर एकेरी टीका करताना उद्धव म्हणाले की, आमदार, मंत्री आता मुख्यमंत्री झाले तरी अजून पक्षप्रमुख व्हायचं आहे. इतकी हाव आहे. पण लायकी आहे का? स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. वडिलांना काय वाटत असेल की हे माझ्या नावाच्या ऐवजी दुसऱ्याच्या वडिलांच नाव लावत आहे. आनंद दिघे आज आठवले आहेत कारण आज ते बोलू शकणार नाहीत. पण आनंद दिघे एकनिष्ठ होते जाताना ते भगव्यातून गेले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्याचे दाखवत महागाई मुद्द्यावर बोलले पाहिजे असे उद्धव म्हणाले. केवळ गायींवर बोलण्यापेक्षा महागाईवर बोला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हुसबाळे यांच मी अभिनंदन करतो. त्यांनी संघाला आणि भाजपाला आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. वाढती गरिबी, बेकारी, विषमता याच्यावर त्यांनी आरसा दाखवला.