उद्धव ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दाही ढकलला केंद्रावर

उद्धव ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दाही ढकलला केंद्रावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महा विकास आघाडी सरकार अनेकदा केंद्राकडे बोट दाखवत आपल्या जबाबदारीतून पळ काढताना दिसले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हाच पवित्र आजमावत भोंग्याचा विषयही केंद्राकडे तो लावण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर भोंगा बंदी करून टाकावी असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नव्या एका मुद्द्यावरून ठाकरे सरकार विरुद्ध मोदी सरकार असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात गेली काही दिवस मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विषयाला हात घालत नव्या सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. पण या विषयात केंद्र सरकारकडे बोट दाखवत हात झटकण्याचा पवित्रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजमावल्याचे दिसते.

हे ही वाचा:

Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका

‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा

चेन्नईच्या संघाची धुरा पुन्हा धोनीकडे

दैनिक लोकसत्ता आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच भोंग्याच्या विषयात मतप्रदर्शन केले. नोटबंदी, जीएसटी, लॉकडाउन देशभर केले तसेच भोंगाबंदी सुद्धा देशभर करा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या विधानाला भारतीय जनता पार्टीच्या गोटातून काय प्रत्युत्तर मिळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. आज देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर सभा सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत फडणवीस भोंग्यांच्या मुद्द्यावर बोलणार का? याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

Exit mobile version