मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेट होणार असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण घटनाबाह्य ठरवल्यानंतर आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे असे म्हणत ठाकरे सरकार आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा खटाटोप करताना दिसत होते. त्याच निमित्ताने आता उद्धव ठाकरे हे ८ जून रोजी पंतप्रधानांना भेटणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देताना हे आरक्षण घटनाबाह्य ठरवले. आरक्षणासंदर्भातला हा निकाल आल्यापासूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आरक्षण केंद्र सरकारच देऊ शकते असे सांगत जबाबदारीतून हात झटकण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या संदर्भात आपण पंतप्रधानांना भेटणार असल्याचे त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले होते.

हे ही वाचा:

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?

पहाटेच्या शपथविधीनंतर घरी घेतलं नसतं तर काय लायकी राहिली असती?

अल्फा, डेल्टानंतर हा नवा व्हेरियंट, ७ दिवसांत वजन कमी

पुण्यात हे असतील अनलॉकचे नियम

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील मंत्र्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मराठा आरक्षणासंदर्भात भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आरक्षण देण्यासंदर्भात लिहिलेले पत्र राज्यपालांकडे सुपूर्त करण्यात आलेले होते. यावेळीही पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेणार असल्याचे पुन्हा एकदा बोलून दाखवले होते.

राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा नेते आणि मराठा समाजाचे नागरिक आक्रमक झाले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता या सर्व प्रकरणातून काढता पाय घेण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यासाठीच मुख्यमंत्री आता पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version