“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरेंकडून ‘सीएए’वर राजकारण सुरू”

अमित शाह यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरेंकडून ‘सीएए’वर राजकारण सुरू”

नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए मागे घेतला जाणार नाही, असं ठाम वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुका आता कधीही जाहीर होतील अशी वेळ असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा केंद्र सरकारने लागू केला. या संदर्भात ‘सीएए’वर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही अमित शाह यांनी खुलं आव्हान दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

मुलाखतीत केलं आहे. लोकसभा निवडणुका आता कधीही जाहीर होतील अशी वेळ असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा केंद्र सरकारने लागू केला. या संदर्भात ‘सीएए’वर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही अमित शाह यांनी खुलं आव्हान दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

उद्धव ठाकरेंनी ‘सीएए’बाबत भूमिका स्पष्ट करावी

भाजपाने आपलं अपयश लपविण्यासाठी हा कायदा आणला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, “मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावं की, हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको,” असं थेट आव्हान अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

“उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे,” असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर  निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

ऑनलाइन ट्रोलिंगनंतर तरुणीने रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले!

शाहजहान शेखचा शाळा सोडल्याचा दाखला बांगलादेशचा!

मतदारांशी संपर्क साधण्यात राहुल गांधींकडून चूक

ममता बॅनर्जी यांनी ‘सीएए’ला विरोध करून बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंचे अहित करु नये

यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टीकेची तोफ डागली आहे. “ममता यांना हात जोडून विनंती आहे की, राजकारण करण्यासाठी अनेक इतर मार्ग आहेत. बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंचे अहित करु नका. बांगलादेशातून जे बंगाली हिंदू आले आहेत त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आम्ही कायदा आणत आहोत. हिंदू-मुस्लिम यांच्यात विसंवाद निर्माण करुन ममता बॅनर्जी राजकारण करत आहेत. त्यांनी एक कायद्यातली तरतूद दाखवावी की जी नागरिकत्व हिरावून घेते. लवकरच पश्चिम बंगालमध्येही भाजपाचं सरकार येईल. ममता बॅनर्जी घुसखोरीचे समर्थन करणार असतील तर तिथे त्यांचे सरकार राहणार नाही,” अशी घाणाघाती टीका अमित शाह यांनी ममता यांच्यावर केली आहे.

Exit mobile version