‘उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

‘उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती’

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका सुरु आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं व्यक्तव्य केलं आहे.उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.ठाकरेंना जनहितापेक्षा पद महत्वाचं होत असं वाटत असावं, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

टीव्ही-९ मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना १९९९ पासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती. लोकसभा निवडणुकीत ३० जागा लढवण्याचा आग्रह होता.मुलाखतीमध्ये फडणवीसांनी उपमुख्यंमत्री अजित पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती. १९९९ च्या निवडणूक निकालानंतर त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत नव्हतं.मुख्यमंत्रीपदासाठी नाव पुढे येत नव्हतं म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. या काळात नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होतील त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी रोखण्याच काम केलं.ठाकरेंना जनहितापेक्षा पद महत्त्वाचं वाटत असावं असं वाटतं, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ३० जागा लढवण्याचा आमचा आग्रह होता. पण लोकसभेच्या जास्त जागा लढवण्याची शिंदे गटाचीही इच्छा होती. त्यामुळे आम्ही कमी जागा घेतल्या. पण युतीत आमच्या जागा वाढल्या आहेत. आता आम्ही युतीतील प्रत्येकाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करत आहोत.

हे ही वाचा:

काशीमध्ये २२ तास राहणार मोदी!

‘निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला लोकानुनयाची गरज नाही’!

पावसाच्या व्यत्यतात कोलकात्याकडून मुंबईचा पराभव!

सूर्यावर दोन मोठे स्फोट; पृथ्वीच्या संपर्क यंत्रणेला फटका बसण्याची शक्यता!

उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधान मोदींच्या विकासकामाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना घेऊन आमच्यासोबत आलेत.आरोपांमुळे आमच्यासोबत आले नाहीत. त्यांच्यावर दोषसिद्ध झालेले नाहीत. भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आरोपाच्या चौकशीची मागणी केली होती. त्या भूमिकेतून ती योग्य होती.बारामतीच्या लढाईत दादांना कुटुंबाने एकटे पाडले. ते अभिमन्यूसारखे एकटे लढले. आमच्या लोकांना अजित पवारांच्या लढ्याचं अप्रुप वाटतं, असंही ते म्हणाले, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे आमच्यासोबत आले मात्र आम्ही त्यांना लोकसभेला जागा देऊ शकलो नाही.कारण की, आम्ही तीन पक्ष एकत्र आलो होतो आणि जागा फक्त ४८ होत्या.पण विधानसभेत त्यांचा विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

Exit mobile version