बाळासाहेबांच्या स्मारक समिती अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टीचा ठराव!

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत मांडला ठराव

बाळासाहेबांच्या स्मारक समिती अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंच्या हकालपट्टीचा ठराव!

उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी पत्रकार परिषद घेत मुंबई, दादर येथे होत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती दिली. या स्मारकाच्या समितीचे ते अध्यक्ष आहेत. मात्र आता त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केली आहे. महापौर बंगल्याच्या जागेत हे स्मारक होत आहे.

या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याविषयीची माहिती उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यावेळी त्यांचे पुत्र व आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील रंगशारदा सभागृहात शिवसेनेची बैठक झाली. त्यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातच शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आणि तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक आहे.

हे ही वाचा:

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार

संस्थानिकांचे टोलनाके २० फूट खाली गाडता येतील का?

भारत बांगलादेश संबंध आणखी ताणले!

आगीच्या तांडवातून वाचलेल्या पाळीव कुत्र्याला घेऊन तो नाचला!

उद्धव ठाकरेंनी स्मारकाचा पहिला टप्पा झाल्यावर स्मारकाला भेट दिली आणि नंतर पत्रकार परिषद घेतली होती.

बैठकीबाबत शिवसेनेचे नेते रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेच्या विचारधारेला उद्धव ठाकरेंनी काळीमा फासला आहे. लाचारी पत्करून ते काँग्रेससोबत गेले. त्यांनी या स्मारकाच्या अध्यक्षपदाचा अजिबात अधिकार नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, असा प्रस्ताव आम्ही बैठकीत मांडला आहे.

कदम म्हणाले की, हा ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. स्मारकाची जागा ही उद्धव ठाकरेंच्या हाती जाता कामा नये. आयत्या बिळावर नागोबा तसे ते मुख्यमंत्रीपदावर बसले. म्हणून त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी.

Exit mobile version