सचिन वाझेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जनतेला उत्तर द्यावे

सचिन वाझेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जनतेला उत्तर द्यावे

सचिन वाझेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर दिले पाहिजे असा घणाघात मुंबई भाजपाने केला आहे. सचिन वाझे प्रकरणावरून मुंबई भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. सचिन वाझे ओसामा बिन लादेन नसेल पण तो वसुलीबाज आहे असे मुंबई भाजपाने म्हटले आहे.

उद्योगपती मनसुख केलेली यांची हत्या आणि शंभर कोटी खंडणी वसुली प्रकरण या सगळ्यात सचिन वाझे या पोलिस अधिकार्‍याचे नाव समोर आले आणि महाराष्ट्राच्या गृहखात्याला काळिमा लागला. त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राचे गृह खात्यातील आजी माजी पोलिसांचे कारनामे समोर येऊ लागले. सचिन वाझे पाठोपाठ माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांचेही नाव पुढे आले.

हे ही वाचा:

‘इंडियन आयडल फेम’ सायली का आहे आशाताईंची भक्त

शरद पवारांचा ‘हा’ कांगावा आता फोल ठरणार

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात नवा धक्कादायक दावा केला आहे. सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ‘मोठ्या प्रमाणात पैसे देऊन’ मनसुख हिरेन याचा खून करायला सांगितले असे राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून आरोपपत्रामध्ये लिहण्यात आले आहे. याच सचिन वाझेचे नाव जेव्हा सुरवातीला पुढे आले होते तेव्हा महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वाझे याची वकिली करताना दिसले होते. त्यावरूनच मुंबई भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

“सचिन वाझेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्राच्या जनतेना उत्तर द्यावे. वाझे हा ओसामा बिन लादेन नसेल, पण तो वसूलीबाज होता हे सिद्ध झाले आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील कोण त्याच्या पाठीशी होते हेही आता समोर येईल.” असे मुंबई भाजपाने म्हटले आहे.

Exit mobile version