निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवल्यानंतर आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडण्यासाठी उद्या दुपारपर्यंतचा वेळ दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय आयोगाकडे दिले होते.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला आपल्या पसंतीचे चिन्ह निवडण्यासाठी सांगितले आहे. त्यासाठी तीन पर्याय दोन्ही गटांना आयोगाने आदेश दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी तीन पसंती चिन्हे दिले आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय दिले आहेत. मात्र आता तीन चिन्हांमुळे पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाकडे जी चिन्हे आहेत त्यांच्या यादीत ठाकरेंनी मागितलेली चिन्हेच नाहीत.
निवडणूक आयोगाकडे जी चिन्ह शिल्लक आहेत त्यापैकी ठाकरे आणि शिंदे गट चिन्ह घेऊ शकतात. ठाकरे गटाने जे चिन्हाचे पर्याय दिलेत ते निवडणूक आयोगाच्या यादीत नाही आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जी यादी त्यांना दिली आहे त्यापैकी एक चिन्ह निवडावे लागणार आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक!! गुगलवर कान्होजी आंग्रेंची पायरेट म्हणून ओळख
नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक
बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक
शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान
उद्धव ठाकरे गटाकडून पक्षाच्या नावासाठीही तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावासाठी शिंदे गटानेही मागणी केली आहे. उर्वरित दोन नावांमध्ये शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नाव देखील उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगकडे पाठवली आहेत. त्यामुळे आता त्यांना उद्या कोणते चिन्ह आणि नाव मिळेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. दरम्यान, अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक असल्याने उद्धव ठाकरे यांना नवे चिन्ह घेऊन निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे.