दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!

नागपूर येथे घेतली पत्रकार परिषद

दुसऱ्या दिवशी सभागृहात आलेले उद्धव म्हणाले, मोदीही सभागृहात येत नाहीत!

नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे मंगळवारी तिथे गेले. पहिल्या दिवशी ते अनुपस्थित होते. त्यावर एका पत्रकारानेच उद्धव ठाकरेंना छेडले. त्यावर उद्धव ठाकरेंनी मजेशीर उत्तर दिले.

उद्धव ठाकरेंनी या अधिवेशनाच्या निमित्ताने आपली भूमिका सांगितल्यावर सदर पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की, तुम्ही सभागृहात हे प्रश्न का मांडत नाहीत? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जनतेच्या सभागृहात प्रश्न मांडले आहेत. माझे सहकारी सभागृहात आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्न पक्षाचा प्रमुख तिथे मांडत नाही. मोदी खासदार आहेत ते कितीवेळ उपस्थित राहतात? ते पंतप्रधान आहेत पण खासदार नाहीत का? त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना बंधनकारक नाहीए का?

उद्धव ठाकरे म्हणाले की, अधिवेशन सुरू झालंय पण बिनखात्याचे मंत्री आहेत. खाते वाटप अजूनही झालेले नाही. कुणावर जबाबदारी आहे? गंमत म्हणून अधिवेशन घेतले जातंय काय? राक्षसी बहुमत मिळाल्यावर मंत्रिमंडळ स्थापन करायला वेळ लागला. कोणताही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय. विरोधी पक्षनेता कधी होणार, यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,  मुख्यमंत्री बनायला वेळ लागला तर विरोधी पक्ष बनायला वेळ लागला तर काय समस्या आहे?

हे ही वाचा:

‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ मते!

उद्धव ठाकरे भेटले फडणवीसांना; अभिनंदनासाठी की विरोधी पक्षनेतेपदासाठी?

रणजितसिंह मोहिते पाटलांवर होणार कारवाई?, भाजपाने शिस्तभंगाची पाठीविली नोटीस

आधी विरोध आता उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेसाठी आग्रही!

निवडणूक आयुक्त निवडणुकीतून निवडा

वन नेशन वन इलेक्शन या संसदेतील विधेयकाबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलायचे तर दिशा भरकटवण्यासाठी हा विषय आणला जात आहे. त्याआधी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करावी. माझं मत आहे की, निवडणूक आयुक्त निवडणुकीतून निवडले गेले पाहिजे. ते नियुक्त करून आम्हाला कायदे शिकवणार असतील तर आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी कुणाची मते घ्यायची, कशी घ्यायची हे ठरवले पाहिजे, असा अजब सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला.

उद्धव ठाकरेंनी बॅलट पेपरवरील निवडणुकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. ते म्हणाले, बॅलट पेपरवर निवडणूक घ्यायला का घाबरता? पूर्वी मी बॅलट पेपरवर मत दिलेली आहे. माझं मत कुठे जातय हे कळलं पाहिजे. शिक्का मारायचो तेव्हा या व्यक्तीच्या चिन्हापुढे शिक्का मारत आहे. व्हीव्हीपॅटवरील मत मोजलं जात नाही. लोकशाही, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. महाराष्ट्रात जे घडलंय ते महाराष्ट्राला जनतेला पटलेले नाही.

Exit mobile version